भांडुपमध्ये अद्ययावत स्मशानभूमी, आमदार सुनील राऊत यांनी शब्द पाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भांडुपमधील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी स्थानिक नागरिकांना दिलेला शब्द पाळला असून भांडुप गाव येथील पै. नामदेव गोविंद भोईर स्मशानभूमीचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण केले आहे. भांडुपला अद्ययावत स्मशानभूमी मिळाली आहे.

शिवसेनेच्या माध्यमातून या स्मशानभूमीचे रुपडे पालटले आहे. नवीन कमानी, शेड तसेच रंगरंगोटीसह इतर सुशोभीकरणाच्या कामामुळे स्मशानभूमी अद्ययावत झाली असून या स्मशानभूमीचे उद्घाटन आमदार सुनील राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. सामूहिक प्रयत्नांमुळे तसेच सुनील राऊत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची भावना या वेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. याप्रसंगी नगरसेवक सुरेश कोपकर, दीपक सावंत, विश्वास शिंदे, सुरेश शिंदे, श्वेता पावसकर, दीपमाला बढे, सुभाष भोईर, संदीप राऊत, परशुराम कोपरकर, बाबा कदम, सुहासिनी परब, शिवसैनिक व स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.