
इस्रायलने अमेरिकेच्या मदतीने इराणवर हल्ला केला आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये शनिवारी सकाळी भीषण स्फोटांचे आवाज ऐकू आले असून शहरातील काही भागांमध्ये धुराचे लोट उठताना दिसत आहेत. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी इराणवर हल्ला केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून देशभर आणीबाणी घोषित केली आहे.
इस्रायलने शनिवारी इराणवर प्रतिबंधात्मक क्षेपणास्त्र हल्ला केला असून तेहरानमध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. शहरातील काही भागांतून धुराचे लोट उठताना दिसत आहेत. इस्रायलने इराणच्या 30 ठिकाणांवर मर्यादीत स्वरुपाचे हल्ले केले आहेत.
दरम्यान, या हल्ल्यानंतर इराणने सर्वोच्त नेते अली खोमेनी यांनी सुरक्षित स्थळी हलवले आहे. तर दुसरीकडे इराणमधील स्फोटांनंतर इस्रायलमध्येही संभाव्य प्रत्युत्तराच्या भीतीने देशभर धोक्याचे सायरन वाजवण्यात आले असून, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच तेल अवीववरून सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
स्थानिक माध्यमांच्या हवाल्याने ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तेहरानमधील युनिव्हर्सिटी स्ट्रीट आणि जमहुरी भागात इस्रायलने अनेक क्षेपणास्त्र डागली आहेत. तसेच मध्य तेहरानमधील पास्तूर स्ट्रीटच्या परिसरातून धुराचे लोट निघताना दिसत आहेत. याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले असून हल्ल्यानंतर लोक सैरावैरा धावताना दिसत आहेत.
Israel has launched a preventative missile attack against Iran, the Israeli defence minister said. Israel’s military said it had protectively sounded air raid sirens in areas across the country “to prepare the public for the possibility of missiles being launched toward Israel”…
— ANI (@ANI) February 28, 2026
दरम्यान, इराणवरील हल्ल्यानंतर प्रत्युत्तराच्या भीतीने खबरदारीचा उपाय म्हणून इस्रायलमध्ये एअर रेड सायरन वाजवले आहेत. गेल्या काही मिनिटांत संपूर्ण इस्रायलमध्ये सायरन वाजवण्यात आले आहेत आणि सेल्युलर उपकरणांवर थेट सुरक्षित ठिकाणांच्या जवळ राहण्याबाबतचे ‘ॲडव्हान्स इन्स्ट्रक्शन अलर्ट’ देण्यात आले आहेत. इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागली जाण्याच्या शक्यता असून त्यासाठी लोकांना तयार करण्याच्या उद्देशाने हा एक ‘प्रोअॅक्टिव्ह अलर्ट’ आहे. आयडीएफ लोकांना सुरक्षित ठिकाणांच्या जवळ राहण्याची विनंती करत आहे, असे ट्विट इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने केले आहे.
Israel Defense Forces tweets, “In the last few minutes, sirens were sounded all throughout Israel, with an advance instruction alert directly to cellular devices to stay within proximity to protected spaces. This is a proactive alert to prepare the public for the possibility of… pic.twitter.com/KWc1pDlFAo
— ANI (@ANI) February 28, 2026

























































