शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण कधी होणार? 6 मिनिटे 22 सेकंद राहणार अंधार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रग्रहणानंतर, या वर्षीच्या सूर्यग्रहणाबद्दलही लोकांना उत्सुकता आहे. तज्ज्ञांच्या मते 2026 मध्ये दोन सूर्यग्रहणे होतील, त्यापैकी पहिले 17 फेब्रुवारी रोजी झाले. वर्षातील दुसरे सूर्यग्रहण 12 ऑगस्ट 2026 रोजी होईल. मात्र, 12 ऑगस्ट रोजी होणारे हे सूर्यग्रहण हिंदुस्थानात दिसणार नाही. हे ग्रहण प्रामुख्याने युरोप, कॅनडा आणि ग्रीनलँडमध्ये दिसेल. हिंदुस्थानात ते दिसणार नसल्याने देशात सुतक काळ पाळला जाणार नाही आणि कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांना मनाई केली जाणार नाही.

2026 या वर्षातील दुसऱ्या सूर्यग्रहणाबाबत सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांना दूर सारत, तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे की शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण 2027 मध्ये होईल. 2 ऑगस्ट 2027 रोजी होणारे हे ग्रहण 21 व्या शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण असेल, जे अंदाजे 6 मिनिटे आणि 22 सेकंद चालेल. इतके मोठे ग्रहण यानंतर 2114 पर्यंत होणार नाही.

अंशतः हे सूर्यग्रहण हिंदुस्थानातील अंदमान आणि निकोबार बेट, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, चंदीगड, छत्तीसगड, दिल्ली, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, ओडिशा, पुद्दुचेरी, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल येथेही दिसेल. म्हणून 2027 च्या ग्रहणाचा सुतक काळ हिंदुस्थानात वैध असेल, दिवसा अंधाराचा काळ असेल, ज्यामुळे रात्रीसारखे दृश्य दिसेल.