ट्रेंड – रेल्वेचा डबा बनवला स्वयंपाकघर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लांब पल्ल्याच्या मेल/एक्स्प्रेस रेल्वे गाडय़ांमध्ये मोबाईल आणि लॅपटॉपसाठी चार्जिंग पॉइंट असतो. मात्र, काही जण या पॉइंटचा वापर करून रेल्वेच्या डब्याला स्वयंपाकघर बनवत असल्याचे आढळले आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एक महिला या चार्ंजग सॉकेटला चक्क इलेक्ट्रिक केटल जोडून चहा बनवताना दिसते. हा व्हिडीओ ‘एक्स’वरून पोस्ट करण्यात आला आहे. त्यात रेल्वेसेवा या अधिपृत हँडललादेखील टॅग करण्यात आले आहे. अशा प्रकारे इलेक्ट्रिक केटल वापरल्यास ट्रेनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याचा धोका असतो. ‘कुठे कसे वागायचे हे चांगल्या सुशिक्षित लोकांना कळत नाही,’ असे या पोस्टमध्ये लिहिले आहे. या पोस्टनंतर रेल्वेने तपास सुरू केला आहे. यापूर्वीदेखील एक महिला ट्रेनमध्ये नुडल्स बनवत होती. संबंधित महिलेवर त्यावेळी रेल्वेने कारवाई केली होती.