
सोशल मीडियावरील काही मुद्दे हे फार महत्त्वाचे असतात. केवळ याकडे एक मुद्दा न पाहता जागरुकपणे पाहिल्यास हेही विषय आपल्या कामाचे ठरु शकतात. नुकतेच एक्सवरील एका पोस्टमुळे मिल्की पनीर हे पुनश्च चर्चेत आले आहे. त्यामुळेच आता मिल्की पनीर रोज घेणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एक्सपायरी होण्यास काही दिवस शिल्लक असतानाही ब्रँडच्या दोन वेगवेगळ्या पॅकेटमध्ये फुगवटा दिसत आहे.
मिल्की मिस्ट हाय प्रोटीन पनीर एक्सपायरी डेट दोन आठवडे बाकी असतानाही फुगलेले होते. त्यामुळेच एक्सपायरी डेटला दहा दिवस बाकी असतानाही पनीरचे बाह्य आवरण कसे फुगले होते यावर आता चर्चा रंगू लागली आहे.
मिल्की मिस्ट पनीरचा असाच अनुभव इतर अनेक ग्राहकांना आल्यामुळे, हा मुद्दा आता सोशल मीडियावर चांगलाच चर्चिला जाऊ लागला आहे. मिल्की पनीर हे काहीजणांना रबरासारखे लागले त्यामुळे काहींनी हे वापरणे सोडून दिल्याचे प्रतिक्रियांदरम्यान उघड झाले. तसेच हे चक्क्यासारखे दिसत असल्यानेही काहींनी याकडे पाठ फिरवली आहे. एकूणच काय तर सध्याच्या घडीला मिल्की पनीर संदर्भातील अनेक पोस्ट आपल्याला सोशल मीडियावर दिसत आहेत.
























































