
मध्यपूर्वेतील तणाव आता टोकाला पोहोचला असून अमेरिकेने इराणविरोधात आरपारच्या लढाईचे संकेत दिले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी इराणला थेट आणि अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला आहे. इराणला आता अण्वस्त्र सज्ज होऊ दिले जाणार नाही आणि त्यांच्या दहशतवादी शक्तीचा पूर्णपणे नायनाट केला जाईल, असे रुबिओ यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांनी ‘थ्री पॉइंट’ प्लॅनही सांगितला.
#WATCH | Washington, DC: On Iran, US Secretary of State Marco Rubio says, “This week, it presented a unique opportunity to take joint action against this threat. We wanted this to have maximum success. We want this operation to be successful at achieving its objectives… Iran… pic.twitter.com/dkdob8pjml
— ANI (@ANI) March 3, 2026
मार्को रुबिओ यांनी वॉशिंग्टनमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना अमेरिकेची पुढील रणनीतीही स्पष्ट केली. इराण आता आपल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या मागे लपून राहू शकणार नाही. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची दहशतवादी क्षमता नष्ट करण्याचा पद्धतशीर निर्णय घेतला आहे आणि आम्ही त्याची अंमलबजावणी करत आहोत, असे स्पष्ट करत मार्को रुबिओ यांनी इराणच्या नाड्या आवळण्यासाठी तीन प्रमुख उद्दिष्टे ठेवली आहेत.
- इराणची सर्व क्षेपणास्त्रे आणि त्यांचे लाँचर्स नष्ट करणे.
- क्षेपणास्त्रे बनवणारे सर्व कारखाने कायमचे बंद करणे.
- इराणचे नौदल (Navy) पूर्णपणे उद्ध्वस्त करणे.
#WATCH | Washington DC: On Iran, US Secretary of State Marco Rubio says, “The president had already made a decision to act on the timing. The president acted on the timing that gave us the highest chance of success… We will systematically take apart the missile program. We will… pic.twitter.com/O05M2YmmLH
— ANI (@ANI) March 3, 2026
इस्रायलच्या सांगण्यावरून अमेरिका हे करत आहे का, या प्रश्नावर रुबिओ म्हणाले की, हे कधी ना कधी घडणारच होते. वाटाघाटी यशस्वी होणार नाहीत आणि इराण केवळ वेळकाढूपणा करत आहे, हे लक्षात आल्यावरच राष्ट्राध्यक्षांनी हा कठोर निर्णय घेतला आहे. रुबिओ यांनी मान्य केले की या कारवाईची मोठी किंमत मोजावी लागेल, परंतु अण्वस्त्रधारी इराण असण्यापेक्षा ही लष्करी कारवाईची किंमत कमी असेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
इराणवर सध्या धार्मिक कट्टर आणि वेड्या लोकांचे राज्य आहे. त्यांना अण्वस्त्रे मिळवण्याची मोठी महत्त्वाकांक्षा आहे. क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि दहशतवादाच्या जोरावर ते अण्वस्त्र कार्यक्रम राबवत आहेत, जेणेकरून जगाने त्यांना हात लावण्याची हिंमत करू नये. पण सध्या इराण इतिहासातील सर्वात कमकुवत स्थितीत आहे. हीच त्यांच्यावर हल्ला करण्याची योग्य वेळ आहे, असेही मार्गो रुबिओ म्हणाले.
























































