
देशातील एक लाख शाळेत यूआयडीएआयने बायोमेट्रिक अपडेट केले आहे, अशी माहिती यूआयडीएआयने दिली. एक लाख शाळेतील 1.2 कोटी विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक डेटा अपडेट केले आहे. हे पाऊल मुलांच्या विविध सरकारी योजना, शिष्यवृत्ती लाभ यांसह आणखी काही योजनांना मदत मिळण्यासाठी उचलण्यात आले आहे. या मोहिमेंतर्गत 15 वर्षांपर्यंतच्या मुलांच्या आधारमध्ये फिंगरप्रिंट आणि डोळ्यांच्या स्पॅनला अपडेट करण्याची सुविधा ऑक्टोबर 2025 पासून वर्षभरासाठी मोफत ठेवण्यात आली आहे. आतापर्यंत 1 लाख 3 हजारांहून अधिक शाळांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
























































