हिंदुस्थानी हवाई दलाचे सुखोई विमान बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका-इराणचे युद्ध हिंदुस्थानच्या दारापर्यंत आल्यामुळे टेन्शन वाढले असतानाच हिंदुस्थानी हवाई दलाचे सुखोई – 30 एमकेआय हे विमान बेपत्ता झाले आहे. आसामच्या जोरहाट येथून या विमानाने उड्डाण केले होते. त्यानंतर कर्बी आंगलाँग जिह्यातील आकाशात असताना विमानाचा रडारशी संपर्क तुटला. हवाई दलाने ’एक्स’वर याबाबत माहिती दिली आहे. विमानाचा शोध सुरू असल्याचेही हवाई दलाच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.