
एमडी ड्रग्जची तस्करीप्रकरणी एकाला डी. एन. नगर पोलिसांनी अटक केली. फौजान अली अहमद तिकीटवाला असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
जोगेश्वरी येथे राहणाऱया एकाने एमडी ड्रग्जचा साठा ठेवला असून तो विक्री करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीची सत्यता पडताळली. डी. एन. नगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने फौजानच्या घरी छापा टाकला. त्याच्या घरातून पोलिसांनी 800 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले. जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत सुमारे 40 लाख रुपये इतकी आहे. पोलिसांनी फौजानविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंद केला. फौजानला ते ड्रग्ज एका जणाने दिले होते. ते दोघे मागणीनुसार एमडी ड्रग्ज हे पुरवत असायचे. या गुह्यात एक जण फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. फरार आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली आहे.



























































