असं झालं तर…कर्जाचा हप्ता चुकला…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेकजण कर्ज काढून घर, गाडी खरेदी करतात. त्याचा नियमित हप्ता म्हणजेच ईएमआय भरतात. मात्र कधी तरी आर्थिक अडचण आली तर ईमएआय भरता येत नाही.

ईएमआय भरण्यास विलंब झाल्यास तत्काळ बँकेशी संपर्क साधून परिस्थिती सांगा आणि दंड भरून हप्ता भरा. यामुळे ‘डिफॉल्टर’ म्हणून नाव जाणे टाळता येईल.

लेट पेमेंट चार्ज आणि थकबाकीवर 1 ते 4 टक्के प्रति महिना अतिरिक्त व्याज लागते. एक ईएमईआय चुकल्यास  सिबिल स्कोअर 50-70 गुणांनी कमी होऊ शकतो.

सतत हप्ते थकल्यास कायदेशीर कारवाई आणि मालमत्ता जप्तीचा धोका संभवतो. 90 दिवसांपेक्षा जास्त काळ हप्ता न भरल्यास बँक वसुली एजंट पाठवू शकते.

आर्थिक अडचण गंभीर असल्यास बँकेशी बोलून कर्जाचा कालावधी वाढवून हप्ता कमी करण्याबाबत चर्चा करा. लवकरात लवकर थकबाकी भरून आपले कर्ज नियमित करा.