
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप देशातील लोकशाही संस्थांवर पद्धतशीरपणे हल्ले करत असून त्यांना देशात ‘एक देश, एक नेता आणि एक पक्ष’ अशी व्यवस्था आणायची आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
ममता बॅनर्जी यांनी X वर एक पोस्ट करत केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्या म्हणाल्या की, निवडणूक आयोग, सीबीआय आणि ईडी यांसारख्या स्वतंत्र संस्थांचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जात आहे. “भाजपला विरोधकांचा आवाज पूर्णपणे दाबून टाकायचा आहे. त्यांना केवळ स्वतःची सत्ता अबाधित ठेवायची असून त्यासाठी ते लोकशाहीच्या मूळ तत्त्वांना हरताळ फासत आहेत,” असे त्या म्हणाल्या.
केंद्राच्या ‘एक देश, एक निवडणूक’ या संकल्पनेवरही त्यांनी टीका केली. हिंदुस्थानसारख्या विविधतेने नटलेल्या देशात संघराज्य रचना महत्त्वाची आहे, मात्र भाजपला सर्व अधिकार आपल्या हातात एकवटायचे आहेत, असा दावा त्यांनी केला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन करत, संविधानाचे रक्षण करण्यासाठी ही लढाई महत्त्वाची असल्याचे सांगितले.
What we are witnessing today is unprecedented, deeply unfortunate, and a direct assault on the democratic foundations of this republic. In their “One Nation, One Leader, One Party” frenzy, BJP has systematically weaponised every democratic institution and every constitutional… pic.twitter.com/236YcYiOzE
— Mamata Banerjee (@MamataOfficial) March 8, 2026





























































