
ओव्हरटेक करताना भरधाव कारने लग्नाच्या वरातीत घुसून नाचणाऱ्या वऱ्हाड्यांना चिरडल्याची थरारक घटना समोर आली आहे. या अपघातात अनेक वऱ्हाडी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये बहुतांश महिलांचा समावेश असून सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जयपूरमधील बस्सी पोलिस स्टेशन परिसरातील दामोदरपुराजवळ ही घटना घडली. लग्नाची वरातीच्या मागे डीजे सेटअप असलेल्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. ब्रेकवरून पाय घसरला आणि एक्सेलेटरवर पडला. यामुळे कार थेट वरातीत नाचणाऱ्या वऱ्हाड्यांच्या अंगावर गेली. अपघातात
जखमींमध्ये अनेक महिलांचा समावेश आहे. जवळच्या लोकांनी त्यांना रुग्णवाहिका आणि खाजगी वाहनांमधून बस्सी उपजिल्हा रुग्णालयात नेले. काहींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले, तर गंभीर जखमींना सवाई मान सिंग रुग्णालयात पाठवण्यात आले.
























































