इंडिगोचे मँचेस्टरला जाणारे विमान अर्ध्या मार्गातून परतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण युद्धामुळे अचानक हवाई सीमा बंद झाल्यामुळे इंडिगोचे दिल्ली येथून मॅंचेस्टरला जाणारे विमान अर्ध्या मार्गातून परत फिरले. युद्धामुळे आखाती देशांमधील हवाई सीमा बंद होत्या. काही मार्ग नुकतेच सुरू करण्यात आले होते. त्यामुळे इंडिगोने दिल्ली ते मँचेस्टर या उड्डाणचे नियोजन केले होते. या प्रवासाला 11 तास लागतात. विमान इथिओपिया आणि इरिट्रिया या देशांच्या सीमेवर होते. त्याचवेळी इरिट्रियाची हवाई सीमा अचानक बंद करण्यात आली. त्यामुळे विमानाने तेथून यु-टर्न घेतला आणि दिल्लीला परतले. इराण युद्धामुळे आखाती देशांवरून जाणारे हवाई मार्ग बंद आहेत. त्यामुळे या भागाला वळसा घालून आफ्रिकेतून युरोपमध्ये जाणाया मार्गाचा वापर विमान कंपन्या करीत आहेत.