
सिद्धेश्वर जलकुंभ येथे नवीन जलवाहिनीचे काम सुरू असल्याने ठाण्यातील काही भागातील पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे. या कामासाठी गुरुवार सकाळी 9 ते शुक्रवार सकाळी 9 असा 24 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
या कालावधीत सिद्धेश्वर तलाव परिसर, रमाबाई आंबेडकरनगर, गणेशवाडी, नितीन कंपनी, पाचपाखाडी, सरोवर दर्शन, चंदनवाडी, खोपट, फ्लॉवर व्हॅली, शेलार पाडा, गोकुळदासवाडी, कोलबाड परिसर पाचपाखाडी, चंदनवाडी, महापालिका परिसर, चरई, धोबीआळी आदी भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे.




























































