
आजच्या काळात कटिंग चहापासून घरातील सामानांचे पेमेंट करण्यासाटी आपण लगेच फोन पुढे करतो. क्यूआर कोड
स्कॅन करताना खबरदारी घेतली पाहिजे.
खोटा क्यूआर कोड लावून ग्राहकांची फसवणूक केली जाऊ शकते. अनेकदा फसवणूक करणारे लोक मूळ क्यूआर कोडवर स्वतःचा दुसरा क्यूआर कोड चिकटवतात.
त्यामुळे तुमचे पैसे स्कॅमरच्या खात्यात जातात. त्यामुळे पेमेंट करण्यापूर्वी क्यूआर कोडवर दुसरा कागद किंवा स्टिकर चिकटवलेला नाही ना याची खात्री करा.
ऑनलाइन पेमेंट करताना स्क्रीनवर ज्या व्यक्तीला किंवा दुकानाला पैसे पाठवायचे आहेत त्याचं नाव दिसते. जर तिथे भलत्याच कोणाचं नाव दिसत असेल तर पेमेंट करू नका.
अनेकजण घाईघाईत क्यूआर कोड स्कॅन करून लगेच ‘पे’ बटण दाबतात. हीच घाई सायबर गुन्हेगारांना संधी देतं. त्यामुळे शांतपणे सर्व माहिती तपासून मगच पैसे पाठवा.


























































