
मुंबईहून रस्कोल एक्स्प्रेसने बिहारकडे जाणाऱ्या प्रवासी महिलेला कल्याण स्थानकानंतर अचानक प्रसूती कळा सुरू झाल्या आणि नातेवाईकांसह अन्य प्रवाशांची एकच धावपळ उडाली. रेल्वेच्या हेल्पलाइनवर संबंधित यंत्रणेला कळवताच कसारा स्थानकात एक्स्प्रेस थांबवण्यात आली. त्या महिलेला सहकारी प्रवाशांनी व कर्मचाऱ्यांनी सुखरूप फलाटावर उतरवले आणि तेथेच तिची प्रसूती झाली. ममताकुमारी असे या महिलेचे नाव असून तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकताच उपस्थितांच्या चेहऱ्यावर आनंद तरळला. बाळ, बाळंतीण दोघेही सुखरूप असून त्यांना कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे.
ममताकुमारी ही आपला पती नगेंद्रकुमार याच्यासह बिहारमध्ये आपल्या गावी | एक्स्प्रेसने प्रवास करत होती. कल्याण- कसारादरम्यान तिला प्रसूती कळा सुर झाल्या. काही मिनिटांतच गाडीतील एक प्रवाशाने रेल्वेच्या हेल्पलाइनला कळवले कसारा स्टेशन मॅनेजर रोहित उबाळे जीआरपी व आरपीएफलादेखील आरोग यंत्रणेसह तातडीने कसारा रेल्वे स्थानका फलाटावर येण्यास निरोप दिला. काह वेळात रुग्णवाहिका, आपत्ती व्यवस्थाप टीमचे सदस्य रमेश अडोळे, काळूबा लहाने, शोभा सोनवणे, सुरेखा भनगीन प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर अ शुक्ला, परिचारिका सोनाली सांगळे, सरपंच प्रकाश वीर आदींची टीम तातडीने कसा-स्थानकात आली.
टाळ्या वाजवून स्वागत
गोंडस बाळाचा जन्म होताच सर्वांन टाळ्या वाजवून कसारा स्थानकातील नव्य प्रवाशाचे स्वागत केले. आपत्ती व्यवस्थाप टीमचे शाम धुमाळ यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.



























































