
मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मुंबईच्या हवेची गुणवत्ता निर्देशांक देखील खूपच खालवला होता. त्यावरून सरकारवर व महापालिकेवर अनेकांनी टीका केली. प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने देखील तिच्या इंस्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत वाढत्या प्रदुषणावर चिंता व्यक्त केली आहे.
दीपिकाने मुंबईच्या एअर क्वालिटी इंडेक्सचा नकाशा तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. त्या नकाश्या नुसार गुरुवारी मुंबईचा AQI हा 153 आहे. त्यासोबत तिने ”हे शहर आणि इथे राहणारी लहान मुलं गुदमरत आहे! हे कितपत योग्य आहे? असा सवाल तिने महापालिकेला केला आहे. तसेच यावर तातडीने उपाययोजना करण्याची देखील मागणी केली आहे.
याआघी अभिनेत्री सयामी खेर आणि रिचा चड्ढा यांनी देखील मुंबईच्या हवेच्या ढासळत्या गुणवत्तेवरून संताप व्यक्त केला होता. सयामीने तर हे प्रदूषण जीवघेणे असल्याचे म्हटले होते.


























































