
इराण-इस्रायल युद्ध संपले असे मानता येणार नाही. युद्धास नेतान्याहू, प्रे. ट्रम्प जितके जबाबदार आहेत, तितकेच युद्धकाळात इस्रायलला ‘फादरलँड’ (पितृभूमी) म्हणून मान्यता देणारेही जबाबदार आहेत. या सगळ्यांना युद्ध अपराधीच मानावे लागेल. पुन्हा ‘बाल देवतेला’ बळी देण्याची दंतकथा युद्धभूमीवर आहेच!
इराण-इस्रायल युद्ध आजही संपलेले नाही. आम्ही युद्ध जिंकलो आहोत असे ट्रम्प यांनी परस्पर जाहीर केल्याने युद्धाचा निकाल लागला असे म्हणता येणार नाही. प्रे. ट्रम्प यांनी युद्धकाळात अशी मूर्खपणाची विधाने अनेकदा केली. आपला जावई जेरेड कुशनर याच्या सांगण्यावरून मी इराणबरोबर युद्ध केले असे सांगून त्यांनी आपल्या अकलेची दिवाळखोरीच जाहीर केली. हा उघड माथेफिरूपणा आहे. प्रे. ट्रम्प यांनी कोणतीही विधाने केली तरी इराण आता मागे हटत नाही हे नक्की. हे युद्ध आता आम्ही शेवटापर्यंत नेऊ, अशी इराणची भूमिका आहे. इराणला सुमारे तीन हजार वर्षांचा इतिहास आहे तसा इस्रायलला नाही. ज्यू धर्मीयांनी स्वतःसाठी एक देश उभा केला त्यास शंभर वर्षेही झाली नाहीत. अरबांच्या जागेत त्यांनी सरळ घुसखोरी केली व जमिनीचा ताबा घेऊन आपला देश उभा केला. पुन्हा ज्या अरबांच्या जागेत ते घुसले, त्या अरबांनाच बेघर केले व पालेस्टिनी पट्टय़ात आता संपूर्ण विध्वंस केला. अर्थात इराणच्या बाबतीत इस्रायल तेच करायला गेले, पण डाव त्यांच्यावरच उलटला. जगभरातील ज्यू लोक एकत्र आले. त्यांनी कष्टाने स्वतःचा देश निर्माण केला. त्यासाठी अनेक संघर्ष व युद्धे केली आणि तो दिमाखदार देश आज पंतप्रधान नेतान्याहू व प्रे. ट्रम्प यांच्यामुळे बेचिराख झाला. त्यांची दिमाखदार राजधानी तेल अवीव इराणच्या बाम्बहल्ल्यांत जळून गेली. हजारो लोकांची घरे नष्ट झाली. इस्रायलने जे गाझात केले तेच तेल अवीवमध्ये घडताना जगाने पाहिले. युद्ध शेवटी निरपराध्यांचेच सर्वाधिक बळी घेते.
कारण काय?
इराण-इस्रायलमध्ये युद्धाचे नेमके कारण काय हे कोणीच सांगू शकलेले नाही. इराण अण्वस्त्र कार्यक्रम करत आहे व त्याने अणुबाम्ब बनवला हा नेतान्याहू यांचा आरोप खरा असेल तर तो अणुबाम्ब इराणने इस्रायलवर टाकायला मागेपुढे पाहिले नसते. इराणकडे क्षेपणास्त्रांचा प्रचंड साठा आहे व त्या हल्ल्यात नेतान्याहू वगैरे लोकांची पळापळ झाली. हे अण्वस्त्रांचे युद्ध नाही. हे एक प्रकारे धर्मयुद्ध आहे. ‘ज्यू विरुद्ध मुसलमान’ असा हा युद्धाचा प्रकार उघड दिसतो व त्याला जेफ्री एपस्टीनच्या गुप्त फायलींचा संदर्भ आहे. स्वतः एपस्टीन हा ज्यू धर्मीय होता व तो मोसादसाठी मोठी भूमिका वठवत होता. प्रे. ट्रम्प यांचा जावई जेरेड कुशनर ज्यू आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर ज्यू लोकांची पकड आहे. BlackRock, Rothschilds family च्या हाती अमेरिकेची अर्थव्यवस्था आहे. हे सगळे अमेरिकेतील प्रभावशाली ज्यू एकत्र आले व त्यांनी युद्धाची काडी केली. इस्रायल आणि शिया मुस्लिमांचे प्राबल्य असलेल्या इराणमध्ये अनेक वर्षांपासून धार्मिक तणाव आहे. त्यात आता ‘बाल’ (baal) देवतेचा संदर्भ काही लोकांनी आणला. काही ज्यू या देवतेस मानतात, काही मानत नाहीत. बाल देवतेची पूजा शक्ती व अघोरी शक्ती मिळविण्यासाठी करतात. एपस्टीन हा त्याच्या बेटावर ‘बाल’ या ज्यू देवतेची पूजा करत होता. या पूजेत लहान मुलींचा बळी दिला जात होता आणि प्रसाद म्हणून त्यांचे रक्त प्यायले जाते तेव्हाच हा विधी संपूर्ण सफल होतो, असे सांगतात. एपस्टीनने जगातील ताकदवर लोकांना ब्लाकमेल करून त्यांना शक्ती मिळवून देण्याचे सांगून ‘बाल’ देवतेच्या विधीमध्ये सामील करून घेतले. जगभरातील बडे उद्योगपती, राजकारणी यांनी इस्रायलला आपली फादरलँड घोषित केले व ते त्या विधीत सहभागी झाले, असा अनेक महत्त्वाच्या ज्यू धर्मीयांचा दावा आहे. अमेरिकास्थित एका ज्यू पत्रकाराने वेगळी व धक्कादायक माहिती दिली. शक्ती देवता असलेल्या ‘बाल’ देवतेचा पुतळा इराणमध्ये जाळला. त्याचा बदला म्हणून लहान मुलींच्या शाळेवर बाम्ब टाकून दोनशे मुलींची आहुती ‘बाल’ देवतेला देऊन इस्रायल-अमेरिकेने युद्ध सुरू केले. इस्रायलला ‘फादरलँड’ म्हणून मान्यता देणाऱ्यांनी हा नरसंहार सहन केला. अशा अनेक दंतकथा व कथा युद्धाच्या पार्श्वभूमीवर चर्चिल्या जात आहेत. इराणवर इतका भयंकर हल्ला करून स्वतःच्या देशाची वाताहत करून घेण्याचे तसे इस्रायलला कारण नव्हते, पण ‘बाल’ देवतेला खूश करून घेण्यासाठी हे युद्ध आणि नरसंहार घडवला गेला. त्यास इस्रायल व जगभरातील असंख्य ज्यू धर्मीयांचा विरोध आहे.
जागतिक पूजा
‘बाल’ देवतेच्या पूजाविधीत कोणकोणते जागतिक नेते सामील झाले होते याची नोंद एपस्टीन फाईल्समध्ये आहे व ही सर्व माहिती इस्रायलच्या मोसादकडे आहे. ही माहिती लैंगिक शोषणाच्या कारनाम्यांपेक्षा भयंकर व अघोरी आहे. मानवतेला काळिमा फासणारी कृत्ये आजही पृथ्वीवर उघडपणे चालतात व सुधारणावादी, सुसंस्कृत म्हणवून घेणाऱ्यां राष्ट्रांचे नेते आपली राजकीय शक्ती वाढावी म्हणून त्या अमानवी धार्मिक कृत्यांत सहभागी होतात. हिंदू, ख्रिश्चन, मुसलमान, जैन, बौद्ध धर्मांत अशा अमानुष विधींना मान्यता नाही. ‘बाल’ ही ज्यूंची देवता आहे की नाही याबाबत वाद आहेत, पण शक्ती प्राप्त करण्यासाठी या देवतेची पूजा केली जाते व अंधश्रद्धेतून बळीही दिले जातात. अशा अंधश्रद्धेला मोठी राष्ट्रे व त्यांचे नेते राजकीय स्वार्थासाठी मान्यता देतात तेव्हा जगाचा अंत जवळ आला असेच समजायला हवे.
मार कोणी खाल्ला?
युद्धात इराण नष्ट झाले असा दावा प्रे. ट्रम्प करत आहेत, पण अमेरिकेच्या लष्करी तळांना ज्या आखाती देशांनी आपली जमीन वापरू दिली, त्या सर्व देशांवर इराणने हल्ले केले. इस्रायलची राजधानी तेल अवीवचे अतोनात नुकसान झाले. साऱ्यां जगाचे ‘इंधन’ होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणने रोखून ठेवले. इस्रायल अजिंक्य आहे व त्याची सुरक्षा व्यवस्था अभेद्य आहे हा भ्रम व दंतकथा निर्माण झाल्या, त्यावर इराणने हल्ला केला. दंतकथेचा पायाच उद्ध्वस्त केला. सर्व दंतकथा व भ्रम उद्ध्वस्त झाले. ‘दाढीवाले’ अज्ञानी व धर्मांध आहेत, ते शूर नाहीत, हा भ्रमही इराणने खोटा पाडला. इस्रायलची विमानतळे, रिफायनरी, मानवी वस्त्या, श्रीमंतांचे टावर, उद्योग इराणच्या हल्ल्यांत नष्ट झाले आहेत. इस्रायलच्या लोकांना युद्ध नको होते, पण राजकारण्यांच्या मस्तवालपणामुळे युद्ध झाले व त्यात सामान्य नागरिक नाहक मेले. नेतान्याहू, प्रे. ट्रम्प हे युद्धास जितके जबाबदार आहेत तितकेच युद्धकाळात इस्रायलला ‘फादरलँड’ म्हणून मान्यता देणारेही जबाबदार आहेत. हे सर्व लोक युद्ध अपराधी आहेत. जनतेने त्यांना सत्तेवरून खाली खेचले पाहिजे. लोकांनी तुम्हाला सत्ता दिली ती स्वतःच्या जनतेचे व देशाचे कल्याण करण्यासाठी. दुसऱ्यांच्या देशात घुसून युद्ध करण्यासाठी नाही. सगळ्यात आधी ‘संयुक्त राष्ट्रे’ नावाच्या संस्थेला टाळे लावले पाहिजे. कारण त्यांचे आता कोणीच ऐकत नाही. मोठी राष्ट्रे जुमानत नाहीत व लहान राष्ट्रांनाही संयुक्त राष्ट्रांविषयी आदर उरलेला नाही. प्रत्येकाची एक बाल देवता आणि फादरलँड आहे. त्या देवतांची पूजा करून फादरलँडपुढे ते शरणागती पत्करतात!
युद्ध का झाले त्यामागचे हेच खरे कारण आहे.
Twitter – @rautsanjay61
Gmail – [email protected]




























































