
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मनातली जाणीव या दिवाळी विशेषांकातर्फे जाणीव उद्याची, स्त्री मनाची या कार्यक्रमाचे आयोजन उद्या, रविवारी सकाळी 10 वाजता दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथे केले आहे. ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विजया वाड, लेखिका राणी दुर्वे, अभिनेत्री विजया बाबर, फिटनेस तज्ञ लीना मोगरे, डॉ. मानसी मेहंदळे, निर्माती अमृता राव, अंकिता प्रभू वालावलकर, उज्ज्वला हावरे यांची यावेळी उपस्थिती असणार आहे. महिलांचे कला सादरीकरण सोहळ्याचे विशेष आकर्षण असणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजिका सोनल खानोलकर यांनी केले.
























































