
”जर तो लहान मुलांना मारणारा जिवंत असेल तर त्याला शोधून ठार मारू”, अशी धमकी इराणने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांना दिली आहे. शनिवारी नेत्यानाहू यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र त्यानंतर इस्रायलने नेत्यानाहू यांच्याबाबत पसरत असलेल्या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले. त्यानंतर इराणने ही धमकी दिली आहे.
”जर तो लहान मुलांना मारमाणारा जिवंत असेल तर आम्ही पूर्ण ताकदिनिशी आमचा शोध सुरू ठेवू आणि लवकरच त्याला ठार मारू” असा इशारा इराणच्या रिवॉल्युशनरी गार्डने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.


























































