
इस्रायल अमेरिका विरुद्ध इराण युद्धात असंख्य हिंदुस्थानी नागरिक दुबई, इजरायल मध्ये अडकून पडले असतानाच भारतीय मारवाडी युवा मंचने पुढाकार घेत दुबईमध्ये अडकून पडलेल्या 156 हिंदुस्थानी नागरिकांना सुखरूप मायदेशी आणले. संघटनेच्या दुबई शाखेने विशेष चार्टर्ड फ्लाईटची व्यवस्था करून या सर्वांना हिंदुस्थानात आणल्यानंतर त्यांचे विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले.
दुबईमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या मदतीला मारवाडी युवा मंच धावून गेला. संघटनेचे पूर्व राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील जैन खाबिया यांनी पुढाकार घेत संघटनेच्या दुबई शाखेशी संपर्क साधला. त्यानंतर हिंदुस्थानी नागरिकांची यादी तयार केली. यावेळी विमानतळावर त्यांचे पूर्व राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील जैन खाबिया यांच्या नेतृत्वाखाली मारवाडी युवा मंच मुंबई शाखेकडून स्वागत करण्यात आले. यावेळी प्रदीप शर्मा, अमित मल्लावत आणि मुंबई अध्यक्ष कपिल कर्नावट उपस्थित होते. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश जैन पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष रवी अग्रवाल उमेश गर्ग व हेमंत शहा यांच्या मार्गदर्शनामुळेच हे सेवा कार्य यशस्वी झाल्याची माहिती सुनील जैन खाबिया यांनी दिली.




























































