छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पाऊस, जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपीट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढत असतानाच, आता अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि जोरदार गारपीट झाली आहे.

अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेतील नागरिकांची आणि वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली. जवळपास अर्धा तास पाऊस झाल्याने काही सखल भागांत पाणी साचले होते. हवामान विभागाने पुढील २४ तास जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता कायम असल्याचे वर्तवले असून नागरिकांना विजांच्या कडकडाटावेळी सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन केले आहे.