Ratnagiri News – प्रशासनाने गॅस टंचाई नाही असे जाहिर केले मग चुली का पेटतायत? युवासेनेचा जिल्हा प्रशासनाला सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्ह्यात एलपीजी गॅस सिलेंडरची टंचाई नाही असे जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले असले तरी आजही अनेक गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. बुकींग करूनही ग्राहकांना सिलेंडर मिळालेला नाही. हॉटेल व्यवसायिकांनी सिलेंडर मिळत नसल्याने चुली पेटवल्या आहेत त्यामुळे प्रशासनाने याबाबत गंभीर भूमिका घेऊन तात्काळ गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा युवासेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे केली आहे. प्रशासनाने गॅस टंचाई नाही असे जाहिर केले मग चुली का पेटतायत? असा सवाल युवासेनेने उपस्थित केला आहे.

युवासेना जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन दिले आहे. यावेळी युवासेना शहर युवाधिकारी आशिष चव्हाण, नाचणे विभाग समन्वयक रीतेश लोखंडे, शिवसेना शाखाप्रमुख प्रसाद रायगंकर, ओमकार कारेकर उपस्थित होते.

गॅसटंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक, हॉटेल व्यावसायिक हे अडचणीत सापडले आहेत.शालेय पोषण आहार, शिवभोजन थाळी, बेघर निवारा केंद्र आणि वसतिगृह यामध्ये गॅसटंचाईमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत त्या तात्काळ दूर करत सिलेंडर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी युवासेनेने केली आहे.