
भायखळा विधानसभा मतदारसंघात माझगाव ताडवाडी, लव लेन, आग्रीपाडा, मुंबई सेंट्रल येथील बीआयटी चाळींचा पुनर्विकास अद्याप मार्गी लागलेला नाही. त्यासंदर्भात अनेकदा निवेदने देण्यात आली, परंतु अद्याप ठोस पावले सरकारने उचललेली नाहीत. बीआयटी चाळींचा पुनर्विकास बीडीडी चाळींच्या धर्तीवर करण्याबाबत सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे आणि त्यासंदर्भात तातडीने संबंधित विभागांची बैठक बोलवण्यात यावी, अशी मागणी शिवसेना आमदार मनोज जामसुतकर यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली.































































