‘के’ वॉर्डामध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील के-पूर्व विभागाचे विभाजन करून के-उत्तर आणि के-दक्षिण असे दोन विभाग केले गेले. परंतु त्या दोन्ही नवनिर्मित विभागांमध्ये फक्त वॉर्ड अधिकारी आहेत, बाकीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. ऑक्टोबर 2024 मध्ये या नवीन कार्यालयांचे पहाटे 2 वाजता उद्घाटन केले गेले, परंतु आज दोन वर्षांनंतरही तिथे नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कर्मचारीवर्गाची नियुक्ती झालेली नाही. या दोन्ही कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारीवर्गाची तातडीने नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना आमदार बाळा नर यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत केली.