Gold Silver Rate – सोने-चांदीच्या दरात मोठ्या घसरणीनंतर कासवगतीने वाढ; अस्थिरता कायम राहण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या वर्षापासून या वर्षाच्या जानेवारीपर्यंत सोने-चांदीच्या दराने तुफानी वाढ नोंदवत गुंतवणूकदारांना मालामाल केले होते. तर या वर्षात जानेवारीपासून सोनेचांदीने गुंतवणूकदारांना मोठा दणका दिला आहे. गुरुवारी शेअर बाजाराप्रमाणेच सोनेचांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती. त्यानंतर शुक्रवारी सोनेचांदीचे दर कासवगतीने वाढत आहेत. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. तर अनेकजण सोने खरेदीसाठी ही योग्य वेळ आहे की दर अजून घरसतील याचा विचार करत आहेत.

शुक्रवारी सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. सोने ३,३०० रुपयांनी महाग झाले. तर चांदी 3,५०० रुपयांनी वधारली असून वायदे बाजारात तेजी दिसत आहे. शुक्रवारी सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली. एमसीएक्सवर सुरुवातीच्या व्यवहारात सोने ३,३०० रुपयांपेक्षा जास्त महाग झाले. चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली.

शुक्रवारी सोने आणि चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली. दोन्ही धातूंचे दर तेजीने उघडले आणि सुरुवातीच्या व्यवहारात स्थिर राहिले. एमसीएक्सवर एप्रिल डिलिव्हरीच्या सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ३,३४८ ने वाढ झाली. दरम्यान, मे डिलिव्हरीच्या चांदीच्या दरातही प्रति किलोग्रॅम 3,५४० ने वाढ झाली. गुरुवारी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात मोठी घसरण झाली होती.

वाढत्या तेलाच्या किमती आणि मध्य-पूर्वेतील तणावामुळे निर्माण झालेल्या महागाईच्या चिंतेने गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा सुरक्षित पर्यायांकडे वळवले आहे. सकाळी सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम २,५२८ ने वाढून १,४७,४८२ वर होता. चांदीचा भाव प्रति किलोग्रॅम ५,२९० ने वाढून २,३६,७५० वर होता. तर दुपारी सोने 1,690 रुपयांच्या वाढीसह 1,46,650 वर व्यवहार करत होते. तर चांदी 1823 रुपयांच्या वाढीसह 2,33,283 वर व्यवहार करत होती.

सकाळच्या सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याचे भाव स्थिर झाले, परंतु ते गेल्या सहा वर्षांतील सर्वात मोठ्या साप्ताहिक घसरणीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. इराणसोबत सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायल संघर्षामुळे वाढलेल्या महागाईच्या अपेक्षा आणि नजीकच्या भविष्यात व्याजदर कपातीची कमी झालेली शक्यता, ही सोन्याच्या दरातील अलीकडील घसरणीमागे कारणे आहेत.

जागतिक बाजारात स्पॉट सोन्याचा भाव ०.२% ने वाढून प्रति औंस $४,६५७.५० झाला. तथापि, डॉलर मजबूत झाल्यामुळे आणि यूएस फेडरल रिझर्व्हच्या नरम भूमिकेमुळे, सोन्याच्या भावात या आठवड्यात आतापर्यंत ७% पेक्षा जास्त घसरण झाली असून, ते सलग तिसऱ्या आठवड्याच्या तोट्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. स्पॉट चांदीचा भाव ०.१% ने वाढून प्रति औंस $७३ वर पोहोचला.

बाजारात सध्या तीव्र अस्थिरता दिसून येत आहे. सध्याची तेजी ही केवळ एक दिलासा देणारी उसळी असू शकते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी बाजार स्थिर होण्याची वाट पाहावी. शुक्रवारी सोने आणि चांदीच्या ईटीएफमध्येही वाढ झाली. दोन्ही ईटीएफमध्ये ४ टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली. मागील दोन दिवसांपासून त्यात घसरण होत होती. शुक्रवारी, १८ पैकी सात चांदीच्या ईटीएफमध्ये ४ टक्क्यांपर्यंत वाढ झाली, तर उर्वरित ईटीएफमध्ये ३ टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली. २५ सोन्याच्या ईटीएफपैकी २३ मध्ये १ ते २ टक्क्यांची वाढ झाली.