
बिग बॉस हिंदी व मराठी दोन्ही घरांमध्ये आपल्या खेळाने व ग्लॅमरस अंदाजाने चर्चेत आलेली निक्की तांबोळी हिने नुकतेच एक फोटोशूट केले आहे. कायम बोल्ड आणि सेक्सी लूक मध्ये दिसणाऱ्या निकीने यावेळेस हिंदुस्थानी पेहरावात फोटोशूट केले आहे. यात तिने हलक्या गुलाबी रंगाचा लांब अनारकली ड्रेस घातला आहे. ना डार्क मेकअप ना मोठे दागिने तिने घातले आहेत. तिच्या या साध्या सिंपल लूकची अनेकांनी तारिफ केली आहे.





























































