विमानात अचानक महिलेचा मृत्यू, क्रू मेंबर्सच्या चुकीमुळे मृतदेहातून पसरली दुर्गंधी; भयंकर परिस्थिती प्रवाशांचा 13 तास प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिटीश एअरवेजच्या हाँगकाँगवरून लंडनला निघालेल्या एका विमानाने उड्डाण केल्यानंतर तासाभरातच विमानातील एका महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान विमानातील क्रू मेंबर्सने विमान माघारी न नेता प्रवास सुरूच ठेवला त्यामुळे विमानातील प्रवाशांना मृतदेहासोबत तब्बल 13 तास प्रवास करावा लागला. दरम्यान कर्मचाऱ्यांनी अशा ठिकाणी तो मृतदेह ठेवला की जिथलं तापमान खूप जास्त होतं त्यामुळे काही वेळातच विमानात दुर्गंधी पसरू लागली होती.

हाँगकाँगवरून विमानाने उड्डाण केल्यानंतर तासाभरातच महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर पायलटने विमान न वळवता किंवा विमानाची इमरजन्सी लँडिंग न करता प्रवास सुरू ठेवला. त्यानंतर क्रू मेंबर्सने महिलेचा मृतदेह प्रवाशांसापासून दूर ठेवण्यासाठी सुरुवातीला शौचालयाचा उपाय सुचवला मात्र प्रवाशांनी तो नाकारला. त्यामुळे नंतर मृतदेह विमानाच्या रिअर गॅलरीत ठेवला. पण विमानाची रिअर गॅलरीमध्ये ठेवला मात्र या गॅलरीचा पृष्ठभागाचे तापमान जास्त असल्याने मृतदेहातून दुर्गंध येऊ लागला. त्यामुळे प्रवासी हैराण झाले. अशा भयंकर परिस्थिती प्रवाशांना 13 तास प्रवास करावा लागला.

या घटनेवर बोलताना ब्रिटीश एअरवेजच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, “आमच्या विमानात एका प्रवाशाचा मृत्यू झाला ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. अशा परिस्थितीत आम्ही प्रोटोकॉलनुसार काम करतो. प्रवाशांच्या सोयीसाठी कर्मचाऱ्यांनी शक्य ते सर्व प्रयत्न केले. आमची सहानुभूती मृत महिलेच्या कुटुंबासोबत आहे.”