फॉर्च्युनर धुण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर नेली, मग जे घडलं ते पाहून नेटकरीही संतापले! व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समुद्राच्या पाण्यात धुण्यासाठी नेलेली फॉर्च्युनर कार वाळूत अडकल्याची घटना गोव्याच्या किनाऱ्यावर घडली. बरेच प्रयत्न करूनही गाडी वाळूतून बाहेर काढता आले नाही. अखेर क्रेनच्या सहाय्याने वाळूतून गाडी बाहेर काढण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गोव्यातील अंजुना परिसरात ही घटना घडली.

गुजरातमधील काही तरुण फॉर्च्युनर कारने गोव्याला आले होते. समुद्रकिनाऱ्यावरील निर्बंधांकडे दुर्लक्ष करत त्यांनी कार समुद्रकिनाऱ्यावर धुण्यासाठी घेऊन गेले. यादरम्यान मोठी लाट आली आणि गाडी वाळूत रुतली. खूप प्रयत्न करूनही, तरुण आणि आसपासचे लोक गाडी बाहेर काढू शकले नाहीत. नंतर क्रेन बोलावून गाडी बाहेर काढण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच गोवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी फॉर्च्युनर चालकाला अटक केली. चालकाविरोधात बेदरकारपणे गाडी चालवणे आणि समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई सुरू केली आहे.