
एसटी महामंडळाच्या ‘राजमाता जिजाऊ’ स्मार्ट बससेवेचे लोकार्पण मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या या 3000 बसगाडय़ांचा ताफा टप्प्याटप्प्याने राज्यभर धावणार आहे. ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’, ‘शिवाई’, ‘हिरकणी’ आणि ‘यशवंती’ या गौरवशाली सेवांच्या परंपरेत आता ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेची भर पडली आहे. बसमध्ये प्रवासी सुरक्षेसाठी चार सीसीटीव्ही पॅमेरे आणि पॅनिक बटणची व्यवस्था करण्यात आली आहे.
विधान भवनाच्या प्रांगणात ढोलताशांचा गजर आणि लेझीमच्या लयबद्ध तालावर ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे उपस्थित होते.
नव्या सेवेमुळे शहरांची कनेक्टिव्हिटी वाढणार
‘राजमाता जिजाऊ’ स्मार्ट बससेवेमुळे मुंबई, पुणे, नाशिक यांसारख्या मोठय़ा शहरांची ‘कनेक्टिव्हिटी’ आणखी सुलभ होणार आहे. 3000 बसगाडय़ांपैकी पहिल्या तुकडीतील 50 गाडय़ा नागपूर विभागासाठी तैनात केल्या जाणार आहेत.

























































