Iran US Israel War – इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव नाकारला, युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेसमोर ठेवल्या 5 अटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचा दावा केला असला तरी इराणने आपली भूमिका अधिक आक्रमक केली आहे. इराणने युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेसमोर पाच मुख्य अटी ठेवल्या आहेत. या अटी मान्य झाल्याशिवाय कोणत्याही करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. केवळ युद्ध थांबवणे पुरेसे नाही; तर वॉशिंग्टनला इराणच्या सार्वभौमत्वाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या सवलती द्याव्या लागतील, असे इराणने स्पष्ट केले आहे.

काय आहेत पाच अटी?

युद्धाचा तात्काळ शेवट – अमेरिका आणि इराणमधील सुरू असलेले लष्करी संघर्ष त्वरित आणि पूर्णपणे थांबवावेत.

भविष्यातील हल्ल्यांची सुरक्षा हमी – भविष्यात अमेरिका इराणवर कधीही लष्करी हल्ला करणार नाही, याची लेखी आणि ठोस कायदेशीर हमी द्यावी.

आर्थिक नुकसानभरपाई – या युद्धामुळे इराणचे जे आर्थिक नुकसान झाले आहे आणि मालमत्तेची हानी झाली आहे, त्याची पूर्ण भरपाई अमेरिकेने करावी.

होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण – जगातील तेल पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचा कायदेशीर आणि नैसर्गिक अधिकार असून त्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळावी.

क्षेपणास्त्र कार्यक्रमावर कोणतीही चर्चा नाही – इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमावर कोणतेही निर्बंध लादले जाऊ नयेत किंवा त्यावर कोणतीही चर्चा केली जाणार नाही. इराण याला आपली संरक्षणात्मक शक्ती मानतो.

ज्याची भीती होती तेच झालं… इराणचा अमेरिकेची युद्धनौका ‘यूएसएस अब्राहम लिंकन’वर क्षेपणास्त्र हल्ला, मध्यपूर्वेतील युद्ध आणखी पेटणार

आम्ही ठरवू तेव्हाच युद्ध थांबेल!

अमेरिकन प्रस्तावाची माहिती असलेल्या एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने ‘प्रेस टीव्ही’शी बोलताना सांगितले की, इराण हे युद्ध तेव्हाच संपवेल जेव्हा तो स्वतः तसा निर्णय घेईल आणि जेव्हा त्याच्या अटी पूर्ण होतील. त्यांनी पुढे असेही म्हटले की, इराणचा इरादा अमेरिकेविरुद्ध आपला बचाव सुरू ठेवण्याचा आहे आणि जोपर्यंत अटी मान्य होत नाहीत, तोपर्यंत जोरदार हल्ले सुरूच राहतील, अशी शपथ त्यांनी घेतली आहे. अमेरिकेने भूतकाळात दोनदा चर्चेदरम्यान इराणचा विश्वासघात केला आहे. वॉशिंग्टनचा अर्थपूर्ण चर्चेत सहभागी होण्याचा कोणताही खरा हेतू नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काय होता ट्रम्प यांचा 15 कलमी प्रस्ताव?

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले होते की, त्यांनी इराणला 15 कलमी शांतता प्रस्ताव पाठवला आहे. ट्रम्प यांनी दावा केला होता की इराणसोबत अमेरिकेची सकारात्मक चर्चा सुरू आहे, मात्र इराणच्या ताज्या भूमिकेने या दाव्याला छेद दिला आहे.

Iran US Israel War – मध्यस्थीच्या गप्पा मारणाऱ्या पाकिस्तानला इराणने लायकी दाखवली; कराचीला जाणारे जहाज होर्मुझच्या वेशीवरूनच हाकलले