
शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा केलेल्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षपदी आज शरद पवार यांची बिनविरोध निवड झाली. सात उपाध्यक्ष आणि 15 कार्यकारिणीची सदस्यदेखील बिनविरोध निवडून आले.
15 मार्च रोजी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या एकूण 40 जागांसाठी निवडणूक पार पडली. त्यापैकी 28 जण याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यानंतर कार्यकारिणीची निवड येत्या 3 एप्रिल रोजी होती. मात्र आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेला अध्यक्षपदासाठी शरद पवार यांच्या व्यतिरिक्त अन्य अर्ज आला नाही. तसेच उपाध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्यांच्या अनुक्रमे सात आणि 15 जागांसाठी तेवढेच अर्ज आले. त्यामुळे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले. किरण सोनावणे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. शरद पवार गेली तीन दशके मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षपदी आहेत. येत्या 3 एप्रिल रोजी साधारण सभेची पहिली बैठक होईल. बैठकीत 1 कार्याध्यक्ष, 1 प्रमुख कार्यवाह, 2 सहकार्यवाह, 1 मुख्य खजिनदार, 2 खजिनदार अशी पदाधिकारी निवड होईल.
नवीन कार्यकारिणी याप्रमाणे
अध्यक्ष – शरद पवार. उपाध्यक्ष ः डॉ. भालचंद्र मुणगेकर, विनायक परब, विद्या चव्हाण, शशी प्रभू, प्रदीप कर्णिक, प्रभाकर नारकर, महेश पवार. कार्यकारी मंडळ ः विवेक भिडे, जयवंत गोलतकर, रवींद्र गावडे, अमेय कोंडविलकर, मकरंद केसरकर, मारुती नांदविस्कर, अॅड. राजेंद्र कोरडे, दिनेश राणे, मारुती नांदविस्कर, उमा नाबर, सतीश राणे, शिल्पा पितळे, हेमंद जोशी, प्रदीप ओगले, महेश उपासनी.

























































