वेब न्यूज – आर्टिमिस 2

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्पायडरमॅन

नासाची आर्टिमिस मोहीम या मोहिमेचा मुख्य उद्देश म्हणजे मानवाला पुन्हा चंद्रावर पाठवणे, तेथे दीर्घकालीन उपस्थिती निर्माण करणे आणि भविष्यात मंगळावर जाण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करणे. आर्टिमिस मोहिमेअंतर्गत पहिला टप्पा म्हणजे आर्टिमिस 1, जो 2022 मध्ये यशस्वीपणे पूर्ण झाला. हा मानवविरहित प्रयोग होता ज्यामध्ये Orion यानाची चाचणी घेण्यात आली. त्यानंतर आता सर्वांचे लक्ष आर्टिमिस 2 कडे लागले आहे. या मोहिमेत चार अंतराळविरांना चंद्राभोवती पाठवले आहे. या मोहिमेसाठी अत्याधुनिक Space Launch System रॉकेट आणि Orion यान वापरले जात आहेत. आर्टिमिस 2 मध्ये अंतराळवीर चंद्रावर उतरणार नाहीत, परंतु त्याभोवती फेरी मारून सुरक्षितपणे पृथ्वीवर परत येतील. पुढील आर्टिमिस 3 मोहिमेत मानवाला प्रत्यक्ष चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवले जाणार आहे. आर्टिमिस मोहिमेचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर संशोधन करण्यावर जास्त भर आहे. आर्टिमिस मिशन हे केवळ चंद्रावर जाण्यापुरते मर्यादित नसून, मानवाच्या अंतराळ प्रवासाच्या पुढील युगाची सुरुवात आहे. आणखी एक रोचक गोष्ट म्हणजेचंद्रावर संसाधनांचा वापर (In-Situ Resource Utilization – ISRU). म्हणजेच, पृथ्वीवरून सर्व काही नेण्याऐवजी चंद्रावरच उपलब्ध असलेल्या पाण्यापासून ऑक्सिजन आणि इंधन तयार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हे यशस्वी झाले तर भविष्यात अंतराळ प्रवास स्वस्त आणि सोपा होऊ शकतो. या मिशनमध्ये मानवाच्या दीर्घकालीन आरोग्यावर अभ्यासकेला जाणार आहे. कमी गुरुत्वाकर्षण, रेडिएशन, आयसोलेशन यांचा शरीरावर आणि मनावर कसा परिणाम होतो याचा सखोल अभ्यास केला जाईल. हे मंगळ मोहिमेसाठी अत्यंत आवश्यक आहे.