पटणा विमानतळावर आढळली तीन जिवंत काडतुसे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पटणा येथील जय प्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाच्या बॅगेत तीन जिवंत काडतुसे आढळल्याने खळबळ उडाली. मोहसीन अली मासूमी असे या प्रवाशाचे नाव आहे. हा प्रवासी दिल्लीला जात होता. एअर इंडियाचे विमान एआय-1892 ने दिल्लीला जात असलेल्या विमान प्रवाशाची नियमित तपासणी सुरू असताना प्रवाशाच्या बॅगेत तीन जिवंत काडतुसे आढळली. सीआयएसएफने तत्काळ कारवाई करत या प्रवाशाला ताब्यात घेत ही काडतुसे जप्त केली. सीआयएसएफने आरोपीला पुढील कारवाईसाठी पोलिसांकडे सोपवले आहे. ही काडतुसे बॅगेत कशी आली हे आपल्याला माहिती नाही, असे आरोपीने म्हटले आहे.