
इराण आणि इस्त्रायलमध्ये संघर्ष आता शिगेला पोहचला आहे. इराणने इस्त्रायलमधील निवासी इमारतींवर केलेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच आता रिफायनरी प्रकल्पाला लक्ष्य केले आहे. हायफा येथील तेल शुद्धीकरण प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा इराणी मीडियाने केला आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने तेहरानला लक्ष्य केल्यानंतर इराणने आता जोरदार पलटवार केला आहे.
दरम्यान याआधी हायफा येथील निवासी इमारतीवर झालेल्या हल्ल्यात आतापर्यंत दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून दोघे बेपत्ता आहेत. हायफा हे भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर आणि माउंट कार्मेलच्या उतारावर वसलेले इस्त्रायलमधील महत्वाचे शहर आहे.
BREAKING:
Reports of an Iranian missile strike on oil Refinery in Haifa
— Iran News 24 (@IRanMediaco) April 6, 2026
























































