लग्नसमारंभाहून परतत असताना कार ट्रकला धडकली, चौघांचा मृत्यू; 8 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लग्नसमारंभ आटोपून घरी परतत असताना भरधाव कारने गवताच्या ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी तिघांवर प्रथमोपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर अन्य पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यात सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. कारमधील सर्वजण देवास जिल्ह्यात एका लग्नाला गेले होते. तेथून परतत असतानाच हा अपघात घडला. मोहम्मद फरहान, आरिश अली, मोहम्मद इरफान आणि अरफाद खान अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.