बस्तरमध्ये टॉप कमांडरसह 40 नक्षलवाद्यांची शरणागती, नक्षल चळवळीला मोठा धक्का

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी (PLGA) या संघटनेचा टॉप कमांडर सोडी केशालू याच्यासह 40 नक्षलवाद्यांनी सोमवारी तेलंगणा पोलिसांसमोर शरणागती पत्करली. बदीसे देवा याच्यानंतर केशालूने शरणागती पत्करल्याने नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे. केशलू हा बस्तरमधील पीएलजीएच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होता. त्याला मल्ला या टोपणनावाने ओळखले जायचे. तो तेलंगणा-छत्तीसगड सीमेवर सक्रिय असलेल्या नक्षलवादी बटालियनचा उप-कमांडर म्हणून कार्यरत होता.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, नक्षलवाद्यांनी एके-47, इन्फास आणि एसएलआर यांसारख्या विविध प्रकारच्या रायफल्ससह अनेक शस्त्रेही पोलिसांकडे सुपूर्द केली. या गटामध्ये विभागीय समिती सदस्य, क्षेत्र समिती नेते आणि प्लॅटून स्तरावरील कॅडर्सचा समावेश आहे. केशालूचा तेलंगणा-छत्तीसगड सीमाभागातील नक्षलवादी कारवायांमध्ये मोठा सहभाग होता.