
देशात पाच राज्यात विधानसभा निवडणुकांमुळे राजकारण तापले आहेत. सर्व पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तसेच पश्चिम बंगालमध्ये एसआयआरचा मुद्दा चर्चेत आला आहे. त्यामुळे सर्वात जास्त चर्चा पश्चिम बंगालच्या निवडणुकांची आहे. आता नुकत्याच झालेल्या ओपिनियन पोलमध्ये ममता बॅनर्जींचा जनतेचा पाठिंबा असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ओपिनियन पोलनुसार तृणमूल काँग्रेसच सरस ठरणार असे दिसत आहे.
पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. संपूर्ण देश पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकांकडे लक्ष ठेवून आहे. मॅट्रिझने या निवडणुकांबाबत एक जनमत चाचणी घेतली आहे. या नुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस म्हणजेच टीएमसीला ४३ टक्के, भाजपला ४२ टक्के आणि इतरांना १६ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. टीएमसीला १४०-१६० जागा, भाजपला १३०-१५० जागा आणि इतरांना ८-१६ जागा मिळण्याची शक्यता आहे. या जनमत चाचणीनुसार पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीच अव्वल ठरणार असल्याचे दिसून येत आहे.
























































