
IPL 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्सची (CSK) सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे. सलग तीन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागल्याने संघ सध्या अडचणीत आहे. पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 8 विकेट्सनी, दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्सने 5 विकेट्सनी, तर तिसऱ्या सामन्यात आरसीबीने चेन्नईचा 43 धावांनी पराभव केला. या तिन्ही सामन्यांमध्ये माजी कर्णधार एमएस धोनी दुखापतीमुळे संघाबाहेर होता, ज्याचा मोठा फटका सीएसकेला बसला आहे.
धोनीच्या दुखापतीबाबत आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, धोनी येत्या काही दिवसांत चेपॉक मैदानावर आपली फिटनेस चाचणी देणार आहे. जर तो या चाचणीत यशस्वी ठरला, तर 11 मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात तो पुनरागमन करू शकतो. चेन्नईचा हा चौथा सामना त्यांच्या घरच्या मैदानावर म्हणजेच एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. धोनीचे पुनरागमन संघाचे मनोबल वाढवण्यासाठी अत्यंत गरजेचे मानले जात आहे.
IPL मुळे माझे आंतरराष्ट्रीय करिअर संपले; माजी खेळाडूचा खळबळजनक खुलासा
हंगामाच्या सुरुवातीलाच धोनीला स्नायू दुखापत झाल्याचे समोर आले होते. फ्रँचायझीने दिलेल्या माहितीनुसार, तो सध्या रिहॅबमधून जात आहे. दरम्यान, त्याला नेटमध्ये सराव करतानाही पाहिले गेले होते, ज्यामुळे चाहत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अद्याप सीएसके व्यवस्थापनाने त्याच्या पुनरागमनावर अधिकृत शिक्कामोर्तब केलेले नसले तरी, दिल्लीविरुद्धच्या सामन्यात ‘थाला’ मैदानात दिसेल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

























































