
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील अभिनेत्री दिशा वाकानी हिचे वडिल व प्रसिद्ध अभिनेते, नाटककार भीम वाकानी यांचे निधन झाले आहे. भीम वाकानी यांनी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत भूमिका केली होती.
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी याबाबत माहिती दिली आहे. ”मी गेल्या काही वर्षांपासून त्यांना ओळखत आहे. मी अहमदाबादमध्ये जेव्हा मालिका बनवायचो तेव्हा आम्ही एकत्र काम केले आहे. त्यांनी दिशा व मयूरवर चांगले संस्कार केले आहेत. आज त्यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले”, असे असित मोदींनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
भीम वाकानी यांनी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत एक छोटी भूमिका साकारली होती. या मालिकेतील चंपक चाचांच्या मित्राच्या भूमिकेत ते दिसले होते.


























































