
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या गुजरात टायटन्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यात गुजरात टायन्सने अवघ्या एक धावाने दिल्लीचा पराभव केला आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर गुजरातने बाजी मारली आणि हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने दिल्लीला 210 धावा करत 211 धावांचे आव्हान दिले होते. आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने कडवी झुंज देत शेवटपर्यंत खिंड लढवली. दिल्लीने 8 गड्यांच्या मोबदल्यात 20 षटकांमध्ये 209 धावा केल्या. केएल राहूल (92), निसांका (41) आणि डेव्हिड मिलर (40*) यांनी दमदार फलंदाजी करत सामना जिवंत ठेवला होता. मात्र, गुजरातच्या गोलंदाजांनी शेवटच्या क्षणी बाजी मारली. राशिद खानने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर प्रसिद्ध कृष्णाने 2 आणि मोहम्मद सिराजने 1 विकेट घेतली




























































