
ओडिशाच्या रायगडा जिह्यात एक रस्ता बनवण्याच्या वादावरून आदिवासी आणि पोलीस यांच्यात तुफान राडा झाला. पोलिसांवर केलेल्या दगडफेकीत 58 पोलीस कर्मचाऱयांसह एपूण 70 जण जखमी झाले आहेत. 10 पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शागाबारी गावाजवळील सिजीमाली बॉक्सइट खदानीपर्यंत रस्ता बनवला जात होता याला स्थानिक आदिवासींनी विरोध दर्शवला. पोलिसांनी शांत राहण्याची सूचना करताच या ठिकाणी हिंसाचार उसळला. स्थानिकांनी दगडफेक, पुऱहाडी आणि लाठीकाठीने हल्ला चढवला.



























































