IPL 2026 – गुजरातने अवघ्या एक धावेने सामना जिंकला, BCCI ने ठोठावला 12 लाखांचा दंड; नेमकं कारण काय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर शुभमन गिलच्या नतेृत्वाखालील गुजरात टायन्सने दिल्ली कॅपिटल्सचा अवघ्या 1 धावेने पराभव केला. शेवटच्या चेंडूंपर्यंत रंगलेल्या या सामन्यात गुजरातने अखेर बाजी मारली आणि हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली. एकीकडे पहिल्या विजयाचा आनंद साजरा होत असतानाचा कर्णधार शुभमन गिलला मोठा झटका बसला आहे. BCCI ने गिलला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

गुजरातच्या तीन फलंदाजांनी झळकावलेली अर्धशतके आणि रशीद खानची भेदक गोलंदाजी या जोरावर संघाने २१० धावांचा डोंगर उभा केला होता. दिल्लीकडून केएल राहुलने ९२ धावांची झुंजार खेळी केली, तर डेव्हिड मिलरने शेवटपर्यंत लढा दिला. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात विहित वेळेत षटके पूर्ण न केल्यामुळे (स्लो ओव्हर रेट) गिलवर 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या आचारसंहितेनुसार मोसमातील हा गुजरातचा पहिलाच गुन्हा असल्याने केवळ कर्णधाराला दंड झाला आहे. मात्र, हीच चूक पुन्हा झाल्यास गिलला 24 लाखांचा दंड भरावा लागेल आणि प्लेइंग इलेव्हनमधील इतर खेळाडूंनाही प्रत्येकी 12 लाखांचा दंड सोसावा लागेल. दिलासादायक बाब म्हणजे, तिसऱ्या चुकीनंतर कर्णधारावर बंदी घालण्याचा नियम आता हटवण्यात आला आहे.

IPL 2026 – मैदानावर आता फक्त 16 खेळाडूंनाच एण्ट्री! आयपीएलचा नवा नियम; सीमारेषेबाहेरील हालचालींवर निर्बंध

या सामन्यात अष्टपैलू रशीद खान ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा मानकरी ठरला. दिल्लीचा संघ सुसाट वेगाने विजयाकडे कूच करत असताना रशीदने आपल्या फिरकीच्या जाळ्यात दिल्लीच्या फलंदाजांना अडकवले. त्याने 4 षटकांत अवघ्या 17 धावा देत 3 महत्त्वाचे बळी टिपले. यामध्ये सलग दोन सामन्यात अर्धशतक ठोकणाऱ्या समीर रिझवीला त्याने शून्यावर बाद करत दिल्लीचे कंबरडे मोडले. रशीदच्या या अचूक गोलंदाजीमुळेच दिल्लीला विजयासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष करावा लागला आणि अखेर त्यांना पराभव पत्करावा लागला.