मोनालिसा अल्पवयीन, फरमान खानविरुद्ध गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रयागराज महाकुंभ मेळ्यातून प्रसिद्ध झालेली मोनालिसा भोसले गेल्या काही दिवसांपासून लग्नामुळे चर्चेत आली आहे. मोनालिसाने आंतरधर्मीय पद्धतीने फरमान खान याच्यासोबत लग्न केले, परंतु ती अल्पवयीन असल्यामुळे फरमान खानविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग (एनसीएसटी) च्या चौकशीत मोनालिसाची जन्मतारीख 30 डिसेंबर 2009 आहे. यामुळे तिच्यासोबत फरमान खानने अवघ्या 16 व्या वर्षी लग्न गेल्याने तो अडचणीत सापडला आहे. फरमान खान याच्या विरोधात पोक्सो अॅक्ट अंतर्गत अन्य कलमांसोबत एससी-एसटी अत्याचार निवारण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोनालिसा आणि फरमान खान यांच्यात जवळपास दीड वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते, अशी माहिती लग्नानंतर फरमान खानने दिली होती. या लग्नाला मोनालिसाच्या पुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे या दोघांनी केरळला जाऊन हे लग्न केल्याची कबुली दिली होती.