मुंबई विमानतळावर 38 कोटींचे सोने जप्त, डीआरआयचे ‘ऑपेरेशन दहाबू ब्लिट्झ’ 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘ऑपरेशन दहाबू ब्लिट्झ’ राबवले. ऑपरेशन दहाबू ब्लिट्झ राबवून सुमारे 38 कोटी रुपयांचे सोने जप्त केले. सोन्याची तस्करी प्रकरणी 24 महिला पॅरिअरना डीआरआयने अटक केली.

आखाती देशातील तस्कर काही देशांतील महिलांना पैशाचे आमिष देऊन त्याच्याकडून तस्करी करून घेतात. नैरोबी येथून काही महिला पॅरिअर या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर डीआरआयने ‘ऑपेरेशन दहाबू ब्लिट्झ’ हाती घेतले.

या ऑपेरेशन अंतर्गत डीआरआयने 24 परदेशी नागरिकांना अडवले. त्या पॅरिअर महिलांना ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली. त्याच्याकडून 25.10 किलो सोन्याच्या लगडी आणि 4.27 किलो सोन्याचे दागिने जप्त केले. काही प्रवाशाने शूजमध्ये तर काहीने अंगावर दागिने लपवले होते. तर काही पॅरिअरने काळ्या टेपने गुंडाळलेली सोन्याची पाकिटे फेकल्याचे समजते.