
शहरी भागातील दैनंदिन जीवन सोपे व्हावे यासाठी सर्वच लहान-मोठय़ा इमारतींमध्ये लिफ्ट बसवण्यात येते. परंतु तांत्रिक बिघाड किंवा वीजपुरवठा खंडित होऊन लिफ्ट मधेच थांबते.
लिफ्ट बंद पडताच घाबरू नका. आपत्कालीन बटण दाबा. लिफ्टमध्ये बसवलेल्या अलार्म किंवा इंटरकॉम सिस्टीमचा वापर करा.
लिफ्टमध्ये मोबाईलला नेटवर्क उपलब्ध असेल तर मदतीसाठी कोणाला तरीकॉल करा. सिक्युरिटीसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करा.
जास्त गर्दी पिंवा हवाबंद लिफ्टमुळे जर व्हेंटिलेशन चांगले होत नसेल किंवा गुदमरल्यासारखे होत असेल तर हळूहळू श्वास घ्या.
जास्त हालचाल टाळा. उडी मारू नका. लिफ्ट चालू होऊन अचानक धक्का बसला तर पडू नये म्हणून कोणतीही वस्तू घट्ट धरून ठेवा.


























































