‘काळी जादू’च्या नावाखाली लूट; मांत्रिक जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काळी जादू, पूजा विधी आणि १२ ज्योतिर्लिंग यात्रेचे आमिष दाखवून ठाण्यातील उच्चभ्रू गृहसंकुलामधील एका कुटुंबाची तब्बल १ कोटी ६६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या मांत्रिकाला ठाणे गुन्हे शाखेने गोव्यातून जेरबंद केले आहे. मंजुनाथ शेट्टी असे अटक केलेल्या मांत्रिकाचे नाव असून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

कासारवडवली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तपास ठाणे गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. मांत्रिक गोव्यात कॅसिनोमध्ये येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सागर सुरलकर आणि मुकुंद आव्हाड यांचे पथक गोव्यात दाखल झाले. मांत्रिक कॅसिनोमध्ये येताच पोलीस पथकाने त्याच्यावर झडप घालून अटक केली.