
पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने आयपीएलमध्ये एका विशेष विक्रमाला गवसणी घातली आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात अर्शदीपने रायन रिकलटनला बाद करत आपले 100 आयपीएल विकेट पूर्ण केले. या कामगिरीसह पंजाब किंग्जसाठी 100 विकेट घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे. तसेच, आयपीएलच्या इतिहासात 100 विकेट्सचा टप्पा गाठणारा तो पाचवा डावखुरा वेगवान गोलंदाज बनला आहे.
IPL 2026 – मुंबईच्या धावसंख्येला वेग, पण पंजाबला मोठा धक्का; शशांक सिंहला दुखापत, मैदान सोडलं
आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत ट्रेंट बोल्ट 144 विकेटसह अव्वल स्थानी आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर जयदेव उनाडकट (114 विकेट), तिसऱ्या क्रमांकावर आशिष नेहरा (106 विकेट) आणि चौथ्या क्रमांकावर झहीर खान (102 विकेट) यांचा क्रमांक लागतो. अर्शदीप सिंग आता 101* विकेटसह या दिग्गजांच्या पंक्तीत पाचव्या स्थानावर विराजमान झाला आहे.


























































