उद्यानातील सोलार बेंचवर वायफाय, मोबाईल चार्जिंग; पालिकेचा अभिनव उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील पालिकेच्या उद्यानांमध्ये आता सोलार बँच बसवण्यात येत असून या ठिकाणी मोफत वायफाय आणि मोबाईल चार्ंजगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रायोगिक तत्त्वावर पर्ह्ट गार्डन आणि वांद्रे येथील ‘जॉगर्स पार्क’मध्ये बसवण्यात आले असून उद्यानात येणाऱ्या पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.

पालिकेच्या उद्यानांमध्ये ही पर्यावरणपूरक योजना राबवण्यात येत असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. हे बेंच दिवसभर चार्ज झाल्यानंतर उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना सहज मोबाईल चार्ज करणे शक्य होणार आहे. सोलार बेंचमुळे विजेची व पैशाची बचत होणार आहे. हे बेंच 30 वर्षे टिकतील, या पद्धतीने तयार करण्यात आल्याचे डिझायनर मयांक पुणेकर यांनी सांगितले.

माहिती डिस्प्ले बोर्डवर

पालिकेच्या उद्यान विभागामार्फत अनेक उपक्रम राबविण्यात येत असतात. फुल, झाडांचे प्रदर्शन हे कुठे व कधी याची माहिती मुंबईकरांना मिळावी यासाठी डिस्प्ले बोर्ड तयार करण्यात येत आहे. या डिस्प्ले बोर्डच्या माध्यमातून उद्यानाशी निगडित माहिती मुंबईकरांना मिळणार आहे.