फास्टॅग Activate नाही? सोप्या पद्धतीने तपासा Status…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फास्टॅग ही एक इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली आहे. त्यामुळे टोलवसुली सोपी आणि जलद झाली आहे. मात्र, अनेकदा टोलनाक्यावर गेल्यावर फास्टॅग काम करत नाही. त्यामुळे चालक आणि प्रवाशांचा वेळ वाया जातो. त्यामुळे प्रवासाला निघण्यापुर्वी फास्टॅग तपासणे गरजेचे आहे. काही सोप्या ट्रिक वापरून काही क्लिकने फस्टॅग स्टेटस तपासता येते.

फास्टॅग कारयरत नसल्यास दुप्पट टोल आकारला जातो. आता प्रवासापूर्वी  फास्टॅगचा कालावधी सोप्या पद्धतीने तपासू शकतात. यामध्ये फक्त वाहन क्रमांकाची आवश्यकता असेल. कोणत्याही ओटीपी किंवा इतर माहितीची आवश्यकता नाही.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या अधिकृत पोर्टलवर एक विशेष सुविधा आहे. कोणालाही त्यांच्या वाहनाच्या फास्टॅगचा कालावधी तपासण्याची ही सुविधा उपलब्ध केली आहे. ‘फास्टॅग स्टेटस’ अंतर्गत कार चालक आणि वाहन मालक त्यांचा फास्टॅग कार्यरत आहे की नाही हे तपासू शकतात. फास्टॅग पडताळणीसाठी NPCI च्या अधिकृत पोर्टलला भेट द्या. तिथे तुम्हाला सर्वात वर ‘Customer’ हा पर्याय दिसेल. त्यानंतर ‘NETC FASTag Status’ वर क्लिक करा. NPCI पोर्टलवर वापरकर्ते फास्टॅग जारी करणाऱ्या बँकेचे नाव, तसेच जारी करण्याची तारीख देखील पाहू शकतात. जर फास्टॅगची मदत संपली असेल बँकेशी किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा. गरज असल्यास जुना फास्टॅग परत करून नव्याने दुसरा घेऊ शकतात. नवीन फास्टॅग खरेदी करणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला नवीन फास्टॅग खरेदी करण्याकरिता तुमच्या बँकेशी किंवा इतर अधिकृत सेवा प्रदात्याशी संपर्क साधावा लागेल.